दहावी बोर्डाची प्रश्नपत्रिका फुटली; धारूरमध्ये चार विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल
दहावी बोर्डाची प्रश्नपत्रिका फुटली; धारूरमध्ये चार विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल
* परीक्षा केंद्रावरून उडी मारून प्रश्नपत्रिका पळवली
* दोन विद्यार्थी ताब्यात; इतर दोघांचा शोध सुरू
* इंग्रजी विषयाची प्रश्नपत्रिका जप्त
सुर्यकांत जगताप
किल्ले धारूर येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेतील दहावी बोर्डाची इंग्रजी विषयाची प्रश्नपत्रिका फुटल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी चार विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमोल राम सिरसट (वय २०), तुषार अरुण भालेराव (वय २०), विजय मुंडे आणि प्रणय औताडे अशी गुन्हा दाखल झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ मार्च २०२५ रोजी दुपारी १२.०० वाजण्याच्या सुमारास जिल्हा परिषद शाळेत दहावीच्या परीक्षेदरम्यान ही घटना घडली. परीक्षा सुरू असताना आरोपी विद्यार्थ्यांनी संगनमत करून प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्रावरून पळवली. पोलिसांनी पाठलाग करून अमोल सिरसट आणि तुषार भालेराव यांना ताब्यात घेतले. विजय मुंडे आणि प्रणय औताडे हे दोघे फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पोलिसांनी अमोल सिरसट याच्या ताब्यातून दहावी बोर्डाच्या इंग्रजी विषयाची प्रश्नपत्रिका जप्त केली आहे. या प्रश्नपत्रिकेवर 'seat no. KO97666' असा क्रमांक आहे.
या घटनेमुळे परीक्षा केंद्रावर एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस हवालदार गवळी करत आहेत.
Comments
Post a Comment