मोरफळीत जनावरांना लाळ्या खुरकूत लसीकरण मोहीम
मोरफळीत जनावरांना लाळ्या खुरकूत लसीकरण मोहीम
पशुधन विकास अधिकारी यांचे आवाहन, सर्व पशुपालकांनी जनावरांना लस टोचून घ्यावी
सुर्यकांत जगताप
किल्ले धारूर तालुक्यातील मोरफळी गावात मंगळवार, दिनांक 11/03/2025 रोजी सकाळी 8:00 वाजता जनावरांना लाळ्या खुरकूत रोगाचे मोफत लसीकरण करण्यात येणार आहे. पशुधन विकास अधिकारी, वैद्यकीय दवाखाना श्रेणी-1 धारूर यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
लाळ्या खुरकूत हा जनावरांमध्ये होणारा एक संसर्गजन्य रोग आहे. या रोगामुळे जनावरांची दूध उत्पादन क्षमता घटते, तसेच जनावरे अशक्त होतात. या रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लसीकरण करणे आवश्यक आहे.
मोरफळी गावातील सर्व पशुपालकांनी आपल्या जनावरांना लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन पशुधन विकास अधिकारी यांनी केले आहे. लसीकरणासाठी जनावरांना गावातच आणावे.
Comments
Post a Comment