श्री साई सायन्स इन्स्टिट्युट धारूरमध्ये 'ज्ञानाचा शोध' प्रश्नमंजुषा स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न.
श्री साई सायन्स इन्स्टिट्युट धारूरमध्ये 'ज्ञानाचा शोध' प्रश्नमंजुषा स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न.
सुर्यकांत जगताप
किल्ले धारूर येथे राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त श्री साई सायन्स इन्स्टिट्युटच्या वतीने आयोजित 'ज्ञानाचा शोध' या प्रश्नमंजुषा स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. शहरातील सहावी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
स्पर्धेत एकूण २०६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. प्रत्येक वर्गातील पहिल्या तीन विजेत्यांना रोख बक्षीस आणि प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.
विजेत्या विद्यार्थ्यांची नावे:
* इयत्ता नववी:
* प्रथम: वेदांत हरीराम नाईकवाडे
* द्वितीय: सार्थक विनायक शिनगारे
* तृतीय: लावण्या ओमप्रकाश तोष्णीवाल
* इयत्ता आठवी:
* प्रथम: आयुष महेश डुबे
* द्वितीय: ऋषिकेश रूपेश चिद्रवार
* तृतीय: आदित्य धीरज भावठाणकर
* इयत्ता सातवी:
* प्रथम: रणवीर रवींद्र कुंभार
* द्वितीय: राधिका आनंद डुबे
* तृतीय: रमण अरुण पिलाजी
* इयत्ता सहावी:
* प्रथम: अबोली गजानन डुबे
* द्वितीय: समर्थ रघुनाथ पांचाळ
* तृतीय: सोहम अमर महामुनी
उपस्थित मान्यवर:
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार अनिल महाजन उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन केले.
आयोजकांचे मनोगत:
श्री साई इन्स्टिट्युटचे प्रमुख निमेश जीवन चिद्रवार यांनी प्रास्ताविकात स्पर्धेचा उद्देश स्पष्ट करताना सांगितले की, शहरातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी व्हावे, यासाठी असे उपक्रम आयोजित केले जातात.
या कार्यक्रमाला पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment