महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्या; धारूरमध्ये तहसील कार्यालयावर धडक मोर्चा
महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्या; धारूरमध्ये तहसील कार्यालयावर धडक मोर्चा
भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन; प्रशासनाला निवेदन सादर
सुर्यकांत जगताप
किल्लेधारूर: बिहारमधील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्यावा आणि तेथील ब्राह्मणांचे अतिक्रमण हटवावे, या मागणीसाठी धारूर तहसील कार्यालयावर आज (१२ मार्च) भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडीने धडक मोर्चा काढला. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गे तहसील कार्यालयापर्यंत काढलेल्या या मोर्चात मोठ्या संख्येने बौद्ध बांधव सहभागी झाले होते.
१९४९ चा कायदा रद्द करावा, या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. भारतीय बौद्ध महासभा, धारूर आणि वंचित बहुजन आघाडी, धारूर यांच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
या आंदोलनात भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा शाखेचे भीमरावजी सिरसट, तालुका अध्यक्ष विष्णू तूपसागर, सरचिटणीस कैलास साळवे, संघटक सनी गायसमुद्रे, माजी नगरसेवक चोखाराम गायसमुद्रे, शहराध्यक्ष सुनील आप्पा सिरसट, वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष प्रशांत उघडे, शहराध्यक्ष आकाश गायसमुद्रे, समता सैनिक दलाचे सैनिक अमर गायसमुद्रे, विनय सिरसट, सार्वजनिक भीम जयंती महोत्सव २०२५ चे अध्यक्ष अजय गायसमुद्रे, किशोर वावळकर, नवनाथ गवळी, अविनाश घायाळ, मस्के विजय मस्के, महादेव वाघमारे, रतन ठोके, बौद्ध उपासक आणि भीमसैनिक उपस्थित होते.
या आंदोलनामुळे धारूर शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. आंदोलन शांततेत पार पडले.
Comments
Post a Comment