नीट व जेईई परीक्षांसाठी मार्गदर्शन - प्रा. सिद्धेश्वर काळे यांचे व्याख्यान
नीट व जेईई परीक्षांसाठी मार्गदर्शन - प्रा. सिद्धेश्वर काळे यांचे व्याख्यान
राजमाता जिजाऊ महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघाच्या वतीने बारावी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष व्याख्यान संपन्न
सुर्यकांत जगताप
किल्ले धारूर, दि. २० मार्च: मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचालित राजमाता जिजाऊ महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघाच्या वतीने कनिष्ठ महाविद्यालयातील बारावी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी नीट व जेईई परीक्षेविषयी विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानात प्रा. सिद्धेश्वर काळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
प्रा. काळे म्हणाले, "शासनामार्फत वैद्यकीय व अभियांत्रिकी प्रवेशासाठी आयोजित केल्या जाणाऱ्या नीट व जेईई परीक्षेची तयारी कशी करावी, परीक्षेत यशस्वी होण्याची तंत्रे कशी अवगत करावी, नीट व जेईई परीक्षेच्या अभ्यासक्रमासंबंधी सविस्तर मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना कोणती पुस्तके अभ्यासासाठी उपयुक्त ठरतील याची सविस्तर माहिती दिली. या परीक्षांतून यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी वेळेचे नियोजन व निश्चित ध्येय मनाशी बाळगणे गरजेचे आहे."
प्राचार्य डॉ. गोपाळ काकडे यांनी अध्यक्षीय समारोपातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, "विद्यार्थ्यांना नीट व जेईई परीक्षांविषयी माहिती मिळाली. बारावी नंतर पुढे काय या प्रश्नाचे उत्तरही प्राप्त झाले. निश्चित ध्येय ठरवून विद्यार्थ्यांनी अभ्यास केल्यास आपणास हव्या त्या क्षेत्रात सहज जाता येईल."
माजी विद्यार्थी संघाचे समन्वयक डॉ. नितीन कुंभार यांनी व्याख्यानाच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष डॉ. कल्याण सावंत यांच्या मार्गदर्शनाने बारावी नंतर पुढे काय यासाठी विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी उपप्राचार्य प्रा. महादेव जोगडे, उपप्राचार्य मेजर डॉ. मिलिंद गायकवाड, पर्यवेक्षक प्रा. सच्चिदानंद ढेपे, आयक्यूएसी समन्वयक डॉ. एल.बी.जाधवर, कार्यालय अधीक्षक श्री. केशव भोंडवे यांसह महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी विद्यार्थी संघाचे समन्वयक डॉ. नितीन कुंभार यांनी केले तर आभार प्रा. राम लोखंडे यांनी मानले.
Comments
Post a Comment