श्री साई सायन्स इन्स्टिट्यूटमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा भावपूर्ण निरोप समारंभ
श्री साई सायन्स इन्स्टिट्यूटमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा भावपूर्ण निरोप समारंभ
विद्यार्थ्यांना भगवद्गीतेचे वाटप, विविध गुणवंतांचा सत्कार; निमेश चिद्रवार यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन
सुर्यकांत जगताप
किल्ले धारूर १८ मार्च रोजी
श्री साई सायन्स इन्स्टिट्यूटमध्ये नुकताच दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना श्रीमद् भगवद्गीता या पवित्र ग्रंथाचे वाटप करण्यात आले. संस्थेचे संचालक निमेश चिद्रवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
गुणवंतांचा सत्कार:
दहावीच्या परीक्षेनंतर विद्यार्थ्यांना निरोप देताना संस्थेने सातवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना गौरविण्यात आले.
निमेश चिद्रवार यांचे मार्गदर्शन:
निमेश चिद्रवार यांनी आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांना जीवनातील यशाचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी सांगितले, "जीवनात यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम, प्रामाणिकपणा आणि सकारात्मक दृष्टिकोन आवश्यक आहे. भगवद्गीतेतील ज्ञान विद्यार्थ्यांना जीवनात योग्य मार्ग दाखवेल."
भावपूर्ण निरोप:
कार्यक्रमाच्या शेवटी, संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना स्नेहभोजन देण्यात आले. संस्थेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना भावनिक निरोप दिला. अनेक विद्यार्थ्यांचे डोळे पाणावले होते.
Comments
Post a Comment