धारूरमध्ये सण-उत्सवांसाठी शांतता समितीची बैठक; धार्मिक सलोखा राखण्याचे आवाहन : - पोलीस निरीक्षक वाघमोडे
धारूरमध्ये सण-उत्सवांसाठी शांतता समितीची बैठक; धार्मिक सलोखा राखण्याचे आवाहन : - पोलीस निरीक्षक वाघमोडे
गुढीपाडवा, रामनवमी, हनुमान जयंती आणि रमजान महिन्यात शांतता राखण्यासाठी चर्चा; पुरवठा अधिकारी काकडेंच्या अध्यक्षतेखाली बैठक
सुर्यकांत जगताप
किल्ले धारूर: आगामी गुढीपाडवा, रामनवमी, हनुमान जयंती आणि रमजान महिन्यात शांतता राखण्यासाठी धारूर पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. तहसील कार्यालयाचे पुरवठा अधिकारी काकडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास वाघमोडे, पीआय भोर, पीआय सरजे यांच्यासह शांतता समितीचे सदस्य, पत्रकार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीत पत्रकार सूर्यकांत जगताप, अनिल महाजन, सादेक इनामदार आणि रामनवमीचे आयोजक भांगे यांनी आपल्या सूचना मांडल्या. पोलीस निरीक्षक देविदास वाघमोडे यांनी सविस्तर मार्गदर्शन करत शांतता राखण्यासाठी प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली. तसेच, कोणत्याही अडचणी आल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले.
पुरवठा अधिकारी काकडे यांनी अध्यक्षीय भाषण केले, यावेळी नगरसेवक राजू कुमार कोमटवार पोलीस कर्मचारी व मोठ्या संख्येने धारूर शहरातील युवक व शांतता समितीचे सदस्य, पत्रकार आणि नागरिकांची मोठी उपस्थिती होती.
Comments
Post a Comment