मस्साजोग सरपंच हत्या प्रकरण: मारेकऱ्याला फाशी द्या; धारूरमध्ये शिवसेनेचे तीव्र आंदोलन
मस्साजोग सरपंच हत्या प्रकरण: मारेकऱ्याला फाशी द्या; धारूरमध्ये शिवसेनेचे तीव्र आंदोलन
सुर्यकांत जगताप
धारूर, दि. 4 मार्च 2025: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मारेकरी वाल्मिक कराड याला फाशी देण्याच्या मागणीसाठी आज धारूरमध्ये शिवसेनेने तीव्र आंदोलन केले. शिवसेनेचे बीड जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांच्या आदेशानुसार झालेल्या या आंदोलनात शिवसैनिकांनी मारेकऱ्याला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली.
किल्ले धारूर तालुका शिवसेनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख नारायण कुरुंद, युवासेना शहर प्रमुख संदेश धुमाळ, उपशहरप्रमुख गोविंद पांचाळ, प्रताप तिबोले, शुभम निक्ते, विजय बारस्कर यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
Comments
Post a Comment