किल्ले धारूर ग्रामीण रुग्णालयात किडनी आजार निदान शिबिर यशस्वी संपन्न



किल्ले धारूर ग्रामीण रुग्णालयात किडनी आजार निदान शिबिर यशस्वी संपन्न

५४ रुग्णांची तपासणी; डॉ. अजित घोडके यांचे मार्गदर्शन

सुर्यकांत जगताप

किल्ले धारूर: सार्वजनिक आरोग्य विभाग, जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा रुग्णालय बीड आणि एचएलएल लाईफकेअर लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने धारूर ग्रामीण रुग्णालयात किडनी आजाराने ग्रस्त अत्यवस्थ ५४ रुग्णांची तपासणी करण्यात आली. जिल्ह्यातील प्रसिद्ध किडनी विकार तज्ञ डॉ. अजित घोडके यांनी किडनी आजाराने ग्रस्त रुग्णांची तपासणी करून उपचार व मार्गदर्शन केले.
या शिबिराकरिता परिसरातील व केज, वडवणी, अंबाजोगाई, परळी तालुक्यातील AKD, CKD तसेच मधुमेह व उच्च रक्त दाबामुळे होणारे किडनीच्या आजाराने ग्रस्त रुग्णांची तपासणी करून उपचार व मार्गदर्शन केले.
या शिबिराकरिता धारूर नगरीचे माजी नगराध्यक्ष तथा ज्येष्ठ डॉक्टर श्री. स्वरूपसिंह हजारी हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते, तर शहरातील ज्येष्ठ पत्रकार श्री. अनिल महाजन, दैनिक कार्यारंभचे श्री. सचिन थोरात, डॉ. सचिन राऊत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रस्तावित वैद्यकीय अधीक्षक केले, तर दैनिक सिटीझनचे ता. प्रतिनिधी श्री. सय्यद रहीम आणि पत्रकार अतिक मोमीन यांची विशेष उपस्थिती होती.
या प्रसंगी मान्यवरांनी मार्गदर्शन करून जिल्ह्यातील पहिली ग्रामीण रुग्णालय स्तरावर उपलब्ध झालेली डायलिसिस सेवेबाबत समाधान व्यक्त करून उपस्थितांना मार्गदर्शन केले.
एचएलएल लाईफ केअरचे क्लस्टर हेड श्री. सागर देशमुख, डॉ. शिंदे, डॉ. परवेज शेख, डॉ. निकते, अरविंद, सुफियान, आकाश, गणेश आणि अफरोज सय्यद यांनी विशेष परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

धारूर न्यायालय परिसरात हाणामारी; पत्रकारावर हल्ला, न्यायालयात खळबळ

अतिक्रमण हटवण्यावरून व्यापारी आणि नगरपरिषदेत मतभेद; रस्ता दुरुस्तीचे काम रखडण्याची शक्यता

श्रीकृष्ण इंग्लिश स्कूलची सयाजीराजे पार्कमध्ये धमाल सहल!