ग्रामऊर्जा फाउंडेशनतर्फे महिला दिन उत्साहात साजरा; आरोग्य शिबिरात महिलांची तपासणी


ग्रामऊर्जा फाउंडेशनतर्फे महिला दिन उत्साहात साजरा; आरोग्य शिबिरात महिलांची तपासणी

 दगडवाडी, गजानन वस्ती, आवरगाव, कोळपिंपरी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन

सुर्यकांत जगताप

किल्ले धारूर : ग्रामऊर्जा ह्युमन डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या वतीने आंबेजोगाई तालुक्यातील दगडवाडी, गजानन वस्ती आणि धारूर तालुक्यातील आवरगाव, कोळपिंपरी येथे जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. दिपाली गिराम यांनी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून हे शिबिर यशस्वीपणे पार पाडले.

आंबेजोगाई आणि धारूर तालुक्यातील कर्तृत्ववान महिलांनी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावली. त्यांनी आपल्या जीवनातील अनुभव महिलांसोबत शेअर केले. आपल्या मुलींना चांगले शिक्षण देऊन मोठ्या पदावर नेण्याची इच्छा पालकांनी व्यक्त केली.

महिला दिनानिमित्त विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते, ज्यात महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. विजेत्या महिलांना ग्रामऊर्जा संस्थेतर्फे मिल्टनच्या बाटल्या देण्यात आल्या, ज्यामुळे महिलांचा उत्साह वाढला. शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा सादर करून कार्यक्रमात रंगत आणली.

यावेळी गावातील सरपंच, उपसरपंच, शिक्षण समिती सदस्य, ग्रामऊर्जा टीम, मुख्याध्यापक, सहशिक्षिका, ग्राम हुनर फेलो आणि गावातील महिला उपस्थित होत्या. या कार्यक्रमामुळे महिलांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण झाली आणि सामाजिक एकजूटही दृढ झाली. शिक्षणाचे महत्त्व महिलांच्या जीवनात किती आणि कसे आहे, याचा अनुभव महिलांना आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामऊर्जा ह्युमन डेव्हलपमेंट फाउंडेशनने विशेष प्रयत्न केले.


Comments

Popular posts from this blog

धारूर न्यायालय परिसरात हाणामारी; पत्रकारावर हल्ला, न्यायालयात खळबळ

अतिक्रमण हटवण्यावरून व्यापारी आणि नगरपरिषदेत मतभेद; रस्ता दुरुस्तीचे काम रखडण्याची शक्यता

श्रीकृष्ण इंग्लिश स्कूलची सयाजीराजे पार्कमध्ये धमाल सहल!