किल्ले धारूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश गायकवाड यांची उपआयुक्तपदी निवड
किल्ले धारूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश गायकवाड यांची उपआयुक्तपदी निवड
त्यांच्या यशस्वी कारकिर्दीला प्रशासकीय सेवेत मोठे यश
सुर्यकांत जगताप
धारूर: किल्ले धारूर नगर परिषदेचे विद्यमान मुख्याधिकारी महेश गायकवाड यांची नुकतीच उपआयुक्तपदी निवड झाली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे धारूर शहरात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
गायकवाड यांनी धारूर नगर परिषदेत आपल्या कार्यकाळात अनेक महत्त्वपूर्ण विकासकामे केली आहेत. त्यांच्या प्रशासकीय कौशल्यामुळे शहरातील अनेक रखडलेले प्रश्न मार्गी लागले. त्यांच्या नेतृत्वाखाली शहरात स्वच्छता अभियान, पाणीपुरवठा योजना, रस्ते विकास आणि इतर अनेक विकासकामे यशस्वीरित्या पूर्ण झाली तसेच चालू आहेत.
गायकवाड यांच्या या यशाबद्दल धारूर शहरातील नागरिकांनी आणि विविध सामाजिक संस्थांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. त्यांच्या पुढील प्रशासकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
Comments
Post a Comment