धारूरमध्ये किडनी विकार शिबिर: मोफत तपासणी, उपचार आणि मार्गदर्शन नामवंत किडनी विकार तज्ञ डॉ. अजित घोडके मार्गदर्शन करणार
नामवंत किडनी विकार तज्ञ डॉ. अजित घोडके मार्गदर्शन करणार
सुर्यकांत जगताप
किल्ले धारूर: धारूर परिसरातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ग्रामीण रुग्णालय धारूर येथे दिनांक ८/३/२०२५ शनिवार रोजी दुपारी १:०० वाजता किडनी विकार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात मोफत तपासणी, उपचार, सल्ला व मार्गदर्शन जिल्ह्यातील नामवंत किडनी विकार तज्ञ डॉ. अजित घोडके करणार आहेत.
या शिबिरात अत्यवस्थ गरजू रुग्णांना मोफत डायलिसिस सेवा उपलब्ध होणार आहे. धारूर, केज, अंबाजोगाई, वडवणी परिसरातील रुग्णांना या शिबिराचा लाभ घेता येणार आहे. तरी, नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि आपल्या परिचितांना याबाबत माहिती द्यावी, असे आवाहन ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment