ज्ञानदीप विद्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात; माता-पालक मेळाव्याला उदंड प्रतिसाद
ज्ञानदीप विद्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात; माता-पालक मेळाव्याला उदंड प्रतिसाद
थोर महिलांच्या आठवणींना उजाळा; महिला पालकांचा सन्मान
सुर्यकांत जगताप
किल्ले धारूर ज्ञानदीप प्राथमिक विद्यालयात जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित माता-पालक मेळाव्याला महिला पालकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रमाता जिजाऊ आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. सुरेखा आगे होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून अर्चना शेळके, माया जाधव, अनुसया उडगे, छाया शेंडगे, सुरेखा सोनटक्के, अनिता जाधव, सुरेखा वाकुडे आदी मान्यवर उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांचा सत्कार केल्यानंतर पालक प्रतिनिधींनी आपले मनोगत व्यक्त केले. शाळेतर्फे आलेल्या सर्व माता पालकांना लेखणी देऊन सन्मानित करण्यात आले.
महिला पालकांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सौ. अर्चना शेळके यांनी प्रथम, सौ. सुरेखा विभुते यांनी द्वितीय, तर सौ. अर्चना कवडे यांनी तृतीय क्रमांक पटकावला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. वर्षा साळवे यांनी केले, तर सौ. मनीषा तिडके यांनी प्रास्ताविक केले. सौ. स्नेहल शिनगारे यांनी आभार मानले. शाळेतील शिक्षकवृंदांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
Comments
Post a Comment