धारूरमध्ये भाजप मंडल बैठक संपन्न; संघटनात्मक बांधणीवर भरआगामी निवडणुकीच्या तयारीवर चर्चा.
धारूरमध्ये भाजप मंडल बैठक संपन्न; संघटनात्मक बांधणीवर भर
आगामी निवडणुकीच्या तयारीवर चर्चा.
सुर्यकांत जगताप
किल्ले धारूर - किल्ले धारूर येथील कैप्टन राजपालसिंह भैया हजारी इंग्लिश स्कूलमध्ये आज, 20 मार्च 2025 रोजी भारतीय जनता पार्टीच्या (भाजप) मंडल बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत संघटनात्मक बांधणी आणि आगामी निवडणुकीच्या तयारीवर चर्चा करण्यात आली.
या बैठकीला भाजपचे प्रदेश सचिव प्रवीण घुगे, जिल्हाध्यक्ष शंकरराव देशमुख, प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. स्वरूपसिंह हजारी, समन्वय सदस्य नवनाथ शिराले, जिल्हा सरचिटणीस देवीदास नागरगोजे, तालुकाध्यक्ष ॲड. बाळासाहेब चोळे, शहराध्यक्ष दत्ता धोत्रे, युवा मोर्चा शहराध्यक्ष ॲड. मोहन भोसले, सोशल मीडिया संयोजक रोहनसिंह हजारी, युवा नेते रामप्रभू मुंडे, संदीप काचगुंडे, नगरसेवक सचिन दुबे, गफार भाई, सुरेश लोकरे, गोरख धूमाळ, बापूराव धूमाळ, माजी तालुकाध्यक्ष अंगद मुंडे, सुरेंद्र तोडणे, अशोक करे, ॲड. नवनाथ पांचाळ, नितीन कांबळे, अहमद भाई, जिलानी भाई, अक्रम भाऊ, सरपंच मल्हारी भालेराव, साहेबराव चव्हाण यांच्यासह शक्ती केंद्र प्रमुख, बूथ प्रमुख आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीत सदस्य नोंदणी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले आणि संघटनात्मक बांधणीवर भर देण्यात आला. भाजपच्या प्रदेश आणि जिल्हा स्तरावरील नेत्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले आणि आगामी निवडणुकीत पक्षाला विजयी करण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले.
Comments
Post a Comment