कै. संतोष देशमुख हत्या प्रकरण: बीड जिल्हा बंद, धारूरमध्ये व्यापाऱ्यांचा निषेध व सहभाग
कै. संतोष देशमुख हत्या प्रकरण: बीड जिल्हा बंद, धारूरमध्ये व्यापाऱ्यांचा सहभाग
सकल मराठा समाजाचा तीव्र संताप, आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी
सुर्यकांत जगताप
धारूर: कै. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज (दि. 4 मार्च 2025) बीड जिल्ह्यात सकल मराठा समाजाच्या वतीने कडकडीत बंद पाळण्यात आला. या बंदला धारूर शहरातील व्यापाऱ्यांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
बीड जिल्हा बंद:
संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे मराठा समाजामध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी करत सकल मराठा समाजाने आज बीड जिल्हा बंदची हाक दिली होती. या बंदला जिल्ह्यातील सर्वच स्तरांतून मोठा प्रतिसाद मिळाला. शहरातील प्रमुख बाजारपेठा, शाळा, महाविद्यालये आणि इतर व्यावसायिक आस्थापना बंद राहिल्या.
धारूरमध्ये व्यापाऱ्यांचा निषेध:
धारूर शहरातील व्यापारी संघाचे अध्यक्ष अशोकरावजी जाधव यांनी सर्व व्यापाऱ्यांना आवाहन केले होते की, संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज बीड जिल्हा बंद पाळण्यात येत आहे. त्यामुळे सर्व व्यापारी बंधूंनी आपली दुकाने बंद ठेवून या निषेधात सहभागी व्हावे. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत धारूर शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून या बंदमध्ये सहभाग नोंदवला.
मराठा समाजाची मागणी:
मराठा समाजाने या प्रकरणी आरोपींना लवकरात लवकर अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. या घटनेमुळे समाजामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून, प्रशासनाने तातडीने योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी समाजाकडून करण्यात येत आहे.
Comments
Post a Comment