पांगरीत ग्रामदरबार संपन्न; शासकीय योजनांची माहिती आणि समस्यांचे निराकरण
पांगरीत ग्रामदरबार संपन्न; शासकीय योजनांची माहिती आणि समस्यांचे निराकरण
गटविकास अधिकारी, आरोग्य अधिकारी आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सुर्यकांत जगताप
किल्ले धारूर : पांगरी ग्रामपंचायत कार्यालयात नुकताच ग्रामदरबार आयोजित करण्यात आला. या ग्रामदरबारामध्ये पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री. लोखंडे साहेब यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. ग्रामस्थांनी शासकीय योजनांची माहिती जाणून घेतली आणि आपल्या समस्या मांडल्या.
ग्रामदरबारामध्ये पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी श्री. कांदे साहेब, पंचायत समिती विस्तार अधिकारी श्री. राऊत साहेब, आरोग्य विभागाचे डॉ. श्री. लोमटे साहेब, श्री. माने साहेब आणि श्री. पालेकर साहेब, विस्तार अधिकारी कृषी, पशुसंवर्धन विकास अधिकारी डॉ. राधिका वराडे मॅडम, महिला बालकल्याण श्री. कुलकर्णी साहेब यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.
ग्रामपंचायत उपसरपंच श्री. श्याम थोरात, किशोर थोरात, सचिन थोरात, अमोल थोरात आणि सम्राट थोरात यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आणि महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामपंचायत अधिकारी श्री. दळवे जी.एम. यांनी केले. उपसरपंच श्री. श्याम थोरात यांनी उपस्थितांचे आभार मानले.
ग्रामदरबारामध्ये आरोग्य, कृषी, पशुसंवर्धन, महिला बालकल्याण आणि इतर शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. ग्रामस्थांनी आपल्या समस्या अधिकाऱ्यांसमोर मांडल्या, ज्यांचे योग्य निराकरण करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.
गटविकास अधिकारी श्री. लोखंडे साहेब यांनी ग्रामस्थांना शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, “ग्रामस्थांनी शासकीय योजनांची माहिती घेऊन त्यांचा लाभ घ्यावा. शासनाच्या विविध योजना ग्रामस्थांच्या विकासासाठी आहेत.”
या ग्रामदरबारामुळे ग्रामस्थांना शासकीय योजनांची माहिती मिळाली आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण झाले, अशी प्रतिक्रिया उपस्थितांनी व्यक्त केली.
Comments
Post a Comment