किल्ले धारूरमध्ये चिमुकल्यांनी रमजानमध्ये ठेवला पहिला रोजा
किल्ले धारूरमध्ये चिमुकल्यांनी रमजानमध्ये ठेवला पहिला रोजा
उन्हाच्या तीव्र झळांमध्येही आठ वर्षीय फैजान अली मोमीनचा उपवास
सुर्यकांत जगताप
किल्ले धारूर: इस्लाम धर्माच्या पवित्र रमजान महिन्याला सुरुवात होऊन आज आठ दिवस पूर्ण झाले आहेत. या पवित्र महिन्यात मुस्लिम धर्मातील लहान-मोठे स्त्री-पुरुष महिनाभर रोजा (उपवास) ठेऊन ईश्वराची प्रार्थना करतात. पाच वेळा नमाज पठण करून पवित्र ग्रंथ कुराणचे वाचन करतात, जकात अदा करतात आणि अल्लाहकडे संपूर्ण जगातील मानव जातीला सुख प्राप्त होवो, सर्वांच्या मनोकामना पूर्ण होवोत, सर्वांना चांगले आरोग्य लाभो, अशी प्रार्थना (दुआ) करतात.
या पवित्र महिन्यात लहान मुलेही घरातील मोठ्यांचे अनुकरण करत रोजा उपवास करतात. विशेष म्हणजे, उन्हाचा पारा चढला असतानादेखील ही चिमुकली मुले रोजा ठेवत आहेत. हे खूप मोठी बाब आहे. अशा भर उन्हाच्या पाऱ्यात फैजान अली मोमीन या आठ वर्षाच्या मुलाने जीवनातील पहिला रोजा पूर्ण केला आहे.
त्याच्या या कामगिरीमुळे नातेवाईक तसेच आई डेव्हलपरर्सचे संस्थापक उमेश भाऊ लुकडे, नगरसेवक फसियोद्दिन शेख, मुजाहेद मोमीन, पत्रकार शाकेर सर, पत्रकार अतिक मोमीन, रौफ भाई, साजिद सर, माजीद भाई पटेल, शेख सलीम, राजा भाऊ कदम, पत्रकार दिनेश कापसे, रमेश मोरे, विनोद कोकाटे आणि मित्रपरिवाराने त्याच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
या बातमीमध्ये रमजान महिन्यातील धार्मिक महत्त्व, लहान मुलांचा सहभाग आणि फैजान अली मोमीनच्या पहिल्या रोजाचे विशेष कौतुक केले आहे.
Comments
Post a Comment