धारूरमध्ये सात वर्षांच्या सादने ठेवला रमजानचा पहिला रोजा
धारूरमध्ये सात वर्षांच्या सादने ठेवला रमजानचा पहिला रोजा
सात वर्षीय सादने इनामदारची प्रेरणादायी कामगिरी
सुर्यकांत जगताप
किल्ले धारूर, दि. 7 मार्च: रोजी धारूरमध्ये एका लहान मुलाने रमजान महिन्याचा उपवास ठेवून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. साद इनामदार या सात वर्षांच्या मुलाने आज रमजान महिन्याचा पहिला रोजा ठेवला. लहान वयातच सादने दाखवलेल्या या धार्मिक निष्ठेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सादचे वडील सादिक म्हणाले, "सादला लहानपणापासूनच धार्मिक गोष्टींमध्ये खूप रस आहे. रमजान महिन्याचे महत्त्व त्याला माहीत होते. त्याने स्वतःहून रोजा ठेवण्याची इच्छा व्यक्त केली. आम्ही त्याला प्रोत्साहन दिले आणि त्याने आज यशस्वीरित्या पहिला रोजा पूर्ण केला."
सादने सांगितले, "मला रोजा ठेवायला खूप आवडले. मला खूप आनंद झाला."
सादच्या . या कामगिरीमुळे लहान मुलांमध्ये धार्मिक मूल्यांची जोपासना करण्याची प्रेरणा मिळेल.
Comments
Post a Comment