किल्ले धारूर डिजिटल मीडिया परिषदेच्या तालुकाध्यक्षपदी मनोज खिंडरे यांची निवड
किल्ले धारूर डिजिटल मीडिया परिषदेच्या तालुकाध्यक्षपदी मनोज खिंडरे यांची निवड
किल्ले धारूर : मराठी पत्रकार परिषदेची संलग्न असलेल्या डिजिटल मीडिया परिषदेच्या किल्ले धारूर तालुकाध्यक्षपदी मनोज खिंडरे यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष दिनकर शिंदे यांनी ही निवड जाहीर केली.
प्रिंट मीडियासोबतच डिजिटल मीडियाला महत्त्व प्राप्त झाल्याने, माहिती तात्काळ वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि डिजिटल मीडियामध्ये काम करणाऱ्या पत्रकारांच्या हितासाठी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी डिजिटल मीडिया परिषद स्थापन केली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आणि राज्याध्यक्ष अनिल वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष दिनकर शिंदे यांनी ही निवड जाहीर केली.
किल्ले धारूर तालुका कार्यकारिणी पुढील दोन वर्षांसाठी जाहीर करण्यात आली आहे. यात कार्याध्यक्षपदी सतीश पोतदार, उपाध्यक्षपदी गोवर्धन बडे, सचिवपदी समाधान चांदणे, तर संघटकपदी बलभीम मुंडे आणि सदस्यपदी सूर्यकांत जगताप यांचा समावेश आहे.
बीड जिल्ह्यात यूट्यूब चॅनल, इंस्टाग्राम, फेसबुक, ब्लॉग, व्हॉट्सॲप, ऑनलाइन दैनिक यांसारख्या डिजिटल माध्यमांतून अनेक पत्रकार काम करत आहेत. त्यांना संघटित करून योग्य दिशेने काम करण्यासाठी आणि त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी डिजिटल मीडिया परिषद काम करणार आहे. तालुका कार्यकारिणीने जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाध्यक्ष दिनकर शिंदे यांनी केले आहे.
Comments
Post a Comment