धारूर ग्रामीण रुग्णालयाकडे जाणारा रस्ता खड्डेमय; रुग्णांचे हालनगरपरिषदेच्या हद्दीतून रस्ता उपलब्ध करून द्यावा,
धारूर ग्रामीण रुग्णालयाकडे जाणारा रस्ता खड्डेमय; रुग्णांचे हाल
नगरपरिषदेच्या हद्दीतून रस्ता उपलब्ध करून द्यावा,
सुर्यकांत जगताप
किल्ले धारूर
रुग्णालयाने नगरपरिषदेला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रुग्णालयाकडे जाणारा रस्ता खूपच खराब झाला आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे रुग्णांना रुग्णालयात आणताना खूप त्रास होतो. रुग्णालयात डायलिसिस विभाग सुरू झाल्यामुळे रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे रस्त्याबाबत रुग्णांच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. रुग्णालयात ये-जा करण्यासाठी नगरपरिषदेच्या हद्दीतून रस्ता उपलब्ध मुख्याधिकारी,नगरपरीषद कार्यालय
करून द्यावा, अशी मागणी डॉ. वाघमारे वैद्यकीय अधिक्षक, वर्ग-१ ग्रामीण रुग्णालय, धारूर यांनी केली आहे.
रुग्णांना रुग्णालयात आणताना खड्डेमय रस्त्यामुळे अधिक त्रास होतो. विशेषत: गंभीर रुग्णांना वेळीच उपचार मिळणे कठीण होते. तसेच, रुग्णालयात ये-जा करणाऱ्या रुग्णवाहिकांनाही अडचणी येत आहेत. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Comments
Post a Comment