घागरवड्यात मूर्तीकलेचा अनोखा आविष्कार! राष्ट्रीय स्तरावरील शिल्पकार ईश्वर उमाप यांनी विद्यार्थ्यांना दिले धडे
घागरवड्यात मूर्तीकलेचा अनोखा आविष्कार! राष्ट्रीय स्तरावरील शिल्पकार ईश्वर उमाप यांनी विद्यार्थ्यांना दिले धडे
विद्यार्थ्यांनी घेतली मूर्तीकलेची माहिती, शिक्षकही झाले मंत्रमुग्ध
सुर्यकांत जगताप
धारूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घागरवाडा येथे 'आनंदी शनिवार' उपक्रमांतर्गत राष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध शिल्पकार ईश्वर उमाप यांनी विद्यार्थ्यांना मूर्तीकलेचे धडे दिले. शाळेतील शिक्षक बांधवांनी केलेल्या विनंतीला मान देऊन उमाप यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना मूर्तीकलेची माहिती दिली.
विद्यार्थ्यांनी मूर्तीकला आणि शिल्पकला यांबद्दल माहिती घेतली आणि ते खूप आनंदित झाले. शाळेतील शिक्षक आंधळे विजय यांचे मूर्ती शिल्प उमाप यांनी प्रत्यक्ष तयार करून दाखवले. उमाप यांची कला पाहून विद्यार्थी आणि शिक्षक भारावून गेले.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक आदमाने, घाडगे मॅडम, नाईक, आत्माराम मुंडे, आंधळे, आगळे, वाकडे, नखाते, अभिजीत सरकटे, विलास वेताळ आणि विद्यार्थी उपस्थित होते.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, घागरवाडा यांच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध मूर्ती शिल्पकार ईश्वर उमाप यांचे आभार मानण्यात आले.