आवरगावने ग्रामपंचायतीचा जिल्हास्तरीय स्वच्छतेत प्रथम क्रमांक!
सुर्यकांत जगताप
धारूर : - बीड येथे संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत २०१९-२० या वर्षासाठी झालेल्या जिल्हास्तरीय ग्रामस्वच्छता स्पर्धेत धारूर तालुक्यातील आव्हाणे ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक पटकावला आहे. पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग मंत्रालय, पाणी स्वच्छता व सहाय्य संस्था, बेलापूर, नवी मुंबई व जिल्हा परिषद, बीड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या स्पर्धेत केलेल्या उत्कृष्ट कार्याची दखल घेण्यात आली.
आव्हाणे ग्रामपंचायतीने स्वच्छता क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय योगदानाच्या गौरवार्थ हे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आदिती भोईर (भा.प्र.से.) यांनी या यशाबद्दल सरपंच अमोल जगताप आणि ग्राम विकास अधिकारी व ग्रामपंचायत सदस्यांचे अभिनंदन केले आहे.
या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल आव्हाणे ग्रामपंचायतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. ग्रामपंचायतीच्या या कार्यामुळे इतर ग्रामपंचायतींनाही स्वच्छतेच्या बाबतीत प्रेरणा मिळेल, असे मत व्यक्त होत आहे. स्वच्छता क्षेत्रात केलेल्या या उत्कृष्ट कार्याबद्दल ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
Comments
Post a Comment