सरस्वती विद्यालयाची एमटीएस ऑलिंपियाडमध्ये विजयी घोडदौड!
सरस्वती विद्यालयाची एमटीएस ऑलिंपियाडमध्ये विजयी घोडदौड!
विद्यार्थ्यांनी पटकावली सुवर्ण, रौप्य पदके आणि मानाची ट्रॉफी
सुर्यकांत जगताप
किल्ले धारूर: शहरातील शैक्षणिक क्षेत्रात नावलौकिक असलेल्या सरस्वती प्राथमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी एमटीएस ऑलिंपियाड स्पर्धेत दमदार कामगिरी करत विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. विद्यार्थ्यांनी सुवर्ण आणि रौप्य पदकांसह मानाची ट्रॉफी मिळवून आपल्या गुणवत्तेची पताका जिल्ह्यासह राज्यातही फडकवली आहे.
५ जानेवारी रोजी झालेल्या एमटीएस ऑलिंपियाड स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला. परीक्षेत सरस्वती विद्यालयातील इकरा मोसीन मुलानी, वेदिका अशोक बोराडे, सय्यद उमेर जिलानी या विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक पटकावले. तर जय महेश घोळवे, वंश पढियार आणि स्वराज नितीन काळे यांनी रौप्यपदक मिळवले. याशिवाय, आराध्या किशोर बोराडे, समर्थ बालाजी मुळे, शिवण्या दत्तात्रय जाधव आणि श्लोक बाबासाहेब फावडे हे विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल विद्यालयात शानदार सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. मुख्याध्यापक तुकाराम डोंगरे यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांना पदके, ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी शिक्षक अमर शुक्ला, गणेश वरकले, रवी कुंभार, अशोक तळस्कर, विजय काळे, उषा मुंडे, ज्योती काळे आणि आदर्श नवोदय तज्ञ शिक्षक नाथा ढगे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सरस्वती विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी एमटीएस ऑलिंपियाड स्पर्धेत मिळवलेले यश खरोखरच कौतुकास्पद आहे. या यशाने केवळ विद्यालयाचीच नव्हे, तर धारूर शहराचीही मान उंचावली आहे.