जागतिक आरोग्य दिनानिमित्त आरोग्यदायी शुभेच्छा!
जागतिक आरोग्य दिनानिमित्त आरोग्यदायी शुभेच्छा!
सुर्यकांत जगताप
किल्ले धारूर आज, ७ एप्रिल २०२५ रोजी जागतिक आरोग्य दिन साजरा होत आहे. यावर्षी 'निरोगी सुरुवात, आशादायी भविष्य' ही संकल्पना असून माता आणि नवजात बालकांच्या आरोग्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
या दिनानिमित्त राज्यातील सर्व नागरिकांना आरोग्यदायी शुभेच्छा! आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभाग, महाराष्ट्र शासन आणि राष्ट्रीय आरोग्य मिशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील नागरिकांच्या आरोग्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
आरोग्य हीच खरी संपत्ती आहे, त्यामुळे सर्वांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असा संदेश आरोग्य विभागाने दिला आहे. नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि वेळेवर आरोग्य तपासणी करणे आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
चला तर मग, या जागतिक आरोग्य दिनी आपण आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेण्याचा संकल्प करूया!
Comments
Post a Comment