शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार 'आकाश ॲग्रो सर्व्हिसेस'चा भव्य शुभारंभ! - चेअरमन रमेशराव आडस्कर यांच्या हस्ते उद्घाटन
शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार 'आकाश ॲग्रो सर्व्हिसेस'चा भव्य शुभारंभ! - चेअरमन रमेशराव आडस्कर यांच्या हस्ते उद्घाटन
सुर्यकांत जगताप ( पत्रकार )
किल्ले धारूर: शेतकऱ्यांच्या सेवेसाठी आणि त्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा लाभ मिळवून देण्यासाठी धारूर शहरात 'आकाश ॲग्रो सर्व्हिसेस' या नवीन कृषी दुकानाचा भव्य शुभारंभ उत्साहात पार पडला. हा कृषी व्यवसाय शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल असा विश्वास यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला.
गुरुवार, दि. २२ मे २०२५ रोजी सकाळी ११:३० वाजता 'आकाश ॲग्रो सर्व्हिसेस'च्या उद्घाटनाचा सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी परिसरातील शेतकरी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटन हस्ते, चेअरमन अंबासाखर कारखाना, अंबाजोगाई येथील श्री. रमेशराव आडस्कर साहेब यांच्या हस्ते झाले.
कार्यक्रमाला नगरपरिषद किल्ले धारूर चे मुख्यधिकारी महेश गायकवाड, राष्ट्रवादी युवक नेते नितीन शिनगारे, बाजार समितीचे उपसभापती सुनील शिनगारे, डॉ.मयूर सावंत आणि ॲड. मोहन भोसले मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना श्री. रमेशराव आडस्कर यांनी 'आकाश ॲग्रो सर्व्हिसेस' हे शेतकऱ्यांसाठी एक वरदान ठरेल असे प्रतिपादन केले. ते म्हणाले की, हे कृषी दुकान शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, खते, कीटकनाशके उपलब्ध करून देईल, ज्यामुळे त्यांची शेती अधिक फायदेशीर होईल.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सुरेश शिनगारे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. बलराम भीमराव शिनगारे, श्री. रामकृष्णा भीमराव शिनगारे सुदर्शन नामदेव शिनगारे आणि प्रो. आकाश बलराम शिनगारे (B.Sc.Agri.ABM) यांनी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या शेतकरी आणि नागरिकांमुळे कार्यक्रमाला एक वेगळीच शोभा आली होती. कार्यक्रमानंतर उपस्थित सर्वांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती.
Comments
Post a Comment