आवरगावचे आदर्श सरपंच अमोल जगताप यांचा 'लोकमत सरपंच अवॉर्ड्स'ने गौरव
आवरगावचे आदर्श सरपंच अमोल जगताप यांचा 'लोकमत सरपंच अवॉर्ड्स'ने गौरव
सुर्यकांत जगताप ( पत्रकार)
किल्ले धारूर: धारूर तालुक्यातील आदर्श गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आवरगावचे सरपंच अमोल जगताप यांनी आपल्या सामाजिक कार्याचा आणि विविध उपक्रमांमधील सक्रिय सहभागाचा ठसा उमटवला आहे. त्यांच्या याच उल्लेखनीय कार्याची दखल घेत नुकत्याच संपन्न झालेल्या 'लोकमत सरपंच अवॉर्ड्स'मध्ये त्यांचा सन्मान करण्यात आला.
सरपंच अमोल जगताप हे नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत गावकऱ्यांच्या हितासाठी तत्पर असतात. विविध विकासकामांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो आणि त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्यामुळे यापूर्वीही अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे.
आवरगावातील शैक्षणिक सुविधा अधिक चांगल्या व्हाव्यात यासाठी सरपंच जगताप यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि आवश्यक सुविधा मिळाव्यात यासाठी ते सतत कार्यरत असतात. त्यांच्या प्रयत्नांमुळेच गावांतील शाळेत अद्ययावत कॉम्प्युटर लॅब सुरू झाली आहे. यामुळे गावातील विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाची माहिती मिळण्यास मदत होत आहे. शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या या महत्त्वपूर्ण योगदानाला आणि कार्याला सलाम म्हणून 'लोकमत सरपंच अवॉर्ड्स'ने त्यांना सन्मानित करण्यात आले. सरपंच जगताप यांच्या कार्यामुळे आवरगावाचे नाव सर्वदूर पोहोचले आहे आणि त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Comments
Post a Comment