अंधार संपला! कोळपिंपरी-पांगरी सरपंचांच्या उपोषणाने अवघ्या तासात वीजपुरवठा पूर्ववत; प्रशासनही जागृत!
अंधार संपला! कोळपिंपरी-पांगरी सरपंचांच्या उपोषणाने अवघ्या तासात वीजपुरवठा पूर्ववत; प्रशासनही जागृत!
सुर्यकांत जगताप ( पत्रकार )
किल्ले धारूर :-
गेले चार दिवस अंधारात असलेल्या धारूर तालुक्यातील कोळपिंपरी आणि पांगरी गावांना काल रात्री मोठा दिलासा मिळाला. दिनांक २२ मे २०२५ रोजी रात्री ८ वाजता, कोळपिंपरीचे सरपंच यादव आणि पांगरीचे सरपंच थोरात यांनी गावकरी, महिला व मुलांसह महावितरण कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. त्यांच्या या प्रभावी एकजुटीमुळे, अवघ्या एका तासाच्या आत वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.
चार दिवसांच्या वीज खंडिततेमुळे विद्यार्थ्यांचा अभ्यास, महिलांची कामे आणि पाणीपुरवठा बाधित होऊन नागरिक त्रस्त झाले होते. या गंभीर समस्येवर त्वरित तोडगा काढण्यासाठी सरपंचांनी दाखवलेले धाडस आणि नेतृत्वाचे गावकरी कौतुक करत आहेत.
या घटनेमुळे प्रशासनानेही नागरिकांच्या समस्यांची तत्परतेने दखल घेतल्याचे स्पष्ट झाले. सरपंचांच्या पुढाकारामुळेच प्रशासनाला लगेच पावले उचलावी लागली, हे या घटनेचे मोठे यश आहे. या दोन्ही सरपंचांचे गावकऱ्यांनी आभार मानले असून, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांच्या एकजुटीची ताकद यातून पुन्हा एकदा दिसून आली आहे. हा गावाच्या विकासाच्या दिशेने एक महत्त्वाचा आणि प्रेरणादायी टप्पा आहे.
Comments
Post a Comment