आवरगावचे आदर्श सरपंच अमोल भैय्या जगताप यांचा सत्कार
आवरगावचे आदर्श सरपंच अमोल भैय्या जगताप यांचा सत्कार
सुर्यकांत जगताप ( पत्रकार )
किल्ले धारूर- धारूर तालुक्यातील आवरगावचे आदर्श सरपंच अमोल भैय्या जगताप यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केल्याबद्दल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी त्यांची फेरनिवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष म्हणून अमोल भैय्या जगताप यांनी यापूर्वी केलेल्या कामाची दखल घेऊन पक्षाने त्यांची पुन्हा एकदा निवड केली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने अनेक विकासकामे यशस्वीपणे पूर्ण केली आहेत. त्यांच्या या कार्यामुळे ते जनतेमध्ये लोकप्रिय आहेत.
या सत्काराच्या वेळी पांगरीचे सरपंच मा. शामराव थोरात, कोळपिंपरीचे सरपंच मा. अशोकराव यादव आणि सर्व मित्र परिवार उपस्थित होते. अमोल भैय्या जगताप यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Comments
Post a Comment