किल्ले धारूर कायाकल्प फाउंडेशनचा वर्धापन दिन उत्साहात; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार!
किल्ले धारूर कायाकल्प फाउंडेशनचा वर्धापन दिन उत्साहात; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार!
सुर्यकांत जगताप ( पत्रकार )
किल्ले धारूर: येथील कायाकल्प फाउंडेशनने आपल्या वर्धापन दिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले. संस्थेने धारूर शहर आणि तालुक्यात शिक्षण, आरोग्य आणि पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे.
वर्धापन दिनाचे औचित्य साधून संस्थेच्या अध्यक्षांच्या दिनेश कापसे यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कायाकल्प फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक लोक कल्याणकारी प्रकल्प राबविले जातात.
संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त धारूर शहरातील नागरिकांनी भेटून अध्यक्ष आणि सदस्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांच्या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
Comments
Post a Comment