स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती उत्साहात साजरी; नगरपरिषद किल्ले धारूर कार्यालयात कर्मचाऱ्यांची मोठी उपस्थिती
स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती उत्साहात साजरी; नगरपरिषद किल्ले धारूर कार्यालयात कर्मचाऱ्यांची मोठी उपस्थिती
सुर्यकांत जगताप ( पत्रकार )
किल्ले धारूर,: स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती आज, २८ मे २०२५ रोजी नगरपरिषद किल्ले धारूर येथील कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी नगरपरिषदेचे कार्यालीन अधीक्षक श्री. जुजगर यांच्यासह सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांनी सावरकरांच्या देशसेवेबद्दल आणि त्यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. कार्यालीन अधीक्षक श्री. जुजगर यांनी सावरकरांच्या दूरदृष्टी आणि त्यागाबद्दल मार्गदर्शन केले.
Comments
Post a Comment