किल्ले धारूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त
किल्ले धारूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त
सुर्यकांत जगताप ( पत्रकार )
किल्ले धारूर, दि. २९ मे २०२५: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्माच्या त्रिशताब्दी वर्षानिमित्त आज धारूर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराला परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यावेळी, रक्तदान करण्यासाठी नेते यशवंत (अण्णा) गायके स्वतः उपस्थित होते आणि त्यांनी रक्तदान करून सर्वांना प्रोत्साहन दिले. त्यांच्यासोबत नेते माधव तात्या निर्मळ आणि मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.
रक्तदान हे श्रेष्ठ दान असून, अहिल्यादेवींच्या जयंतीनिमित्त असे समाजोपयोगी कार्यक्रम आयोजित करणे हे त्यांच्या कार्याला आदरांजली वाहण्यासारखे आहे, असे मत यावेळी अनेकांनी व्यक्त केले. या शिबिरामुळे गरजूंना मोठा आधार मिळणार असून, आयोजकांनी समाधान व्यक्त केले.
Comments
Post a Comment