किल्ले धारूरच्या मुख्याधिकारी महेश गायकवाड यांना 'भारत गौरव - २०२५' पुरस्कार प्रदान
किल्ले धारूरच्या मुख्याधिकारी महेश गायकवाड यांना 'भारत गौरव - २०२५' पुरस्कार प्रदान
सुर्यकांत जगताप ( पत्रकार )
किल्ले धारूर (प्रतिनिधी), २८ मे २०२५: धारूर शहर नगरपालिकेचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी तथा प्रशासक श्री. महेश विजयकुमार गायकवाड यांना विश्व मानवाधिकार परिषदेच्या वतीने प्रतिष्ठित 'भारत गौरव - २०२५' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. धारूर शहरातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लावण्यात आणि शहराच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी केलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाची ही दखल आहे.
श्री. गायकवाड यांनी पदभार स्वीकारल्यापासून धारूर शहरात पाणीपुरवठा योजना, शहरातील मुख्य रस्त्यांचे नूतनीकरण, आणि इतर अनेक प्रलंबित प्रश्न अत्यंत प्रभावीपणे हाताळले आहेत. त्यांच्या दूरदृष्टी आणि कार्यक्षम नेतृत्वामुळे धारूर शहरातील नागरिकांचे अनेक मूलभूत प्रश्न सुटले असून,यामुळे शहराच्या विकासाला एक नवी दिशा मिळाली आहे.
विश्व मानवाधिकार परिषदेने त्यांच्या या उत्तुंग कार्याची प्रशंसा करत त्यांना 'भारत गौरव - २०२५' पुरस्कार प्रदान केला. हा पुरस्कार प्रदान करताना विश्व मानवाधिकार परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. एम.आर. अन्सारी साहेब, राष्ट्रीय उपाध्यक्ष हाजी सय्यद लायक साहेब, आर.टी.आय. सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष तालीम बेग साहेब, मराठवाडा अध्यक्ष ॲड. सय्यद साजेद, आर.टी.आय. सेलचे सचिव सादेक बेग यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
Comments
Post a Comment