मराठवाडा विभागीय टेबल टेनिस स्पर्धेत चि. शौर्यवर्धन शिनगारे यांचे नेत्रदीपक यश
मराठवाडा विभागीय टेबल टेनिस स्पर्धेत चि. शौर्यवर्धन शिनगारे यांचे नेत्रदीपक यश
सुर्यकांत जगताप ( पत्रकार )
किल्ले धारूर : - मराठवाडा विभागीय टेबल टेनिस युथ कंटेन्डर्स स्पर्धा नुकतीच परभणी येथे उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेत मराठवाड्यातील अनेक गुणवंत टेबल टेनिस खेळाडूंनी सहभाग घेतला होता. मात्र, या स्पर्धेत किल्ला धारूरचे सुपुत्र चि. शौर्यवर्धन रामेश्वर शिनगारे यांनी आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
चि. शौर्यवर्धनने या स्पर्धेत अभूतपूर्व यश संपादन केले. त्याने तब्बल चार गटांमध्ये विजेतेपद पटकावले. अंडर १३, अंडर १५, अंडर १७ आणि अंडर १९ या चारही गटांमध्ये त्याने प्रतिस्पर्धकांना धूळ चारत निर्विवाद वर्चस्व गाजवले. त्याच्या या शानदार कामगिरीमुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मराठवाड्यातील टेबल टेनिससाठी हे निश्चितच गौरवास्पद आहे की एकाच खेळाडूने एकाच स्पर्धेत चार गटांमध्ये अव्वल स्थान मिळवले आहे. चि. शौर्यवर्धनच्या या यशामुळे इतर खेळाडूंनाही प्रेरणा मिळेल यात शंका नाही.
Comments
Post a Comment