किल्ले-धारूर येथे महाराणा प्रताप जयंती उत्सव २०२५ ची तयारी पूर्ण
किल्ले-धारूर येथे महाराणा प्रताप जयंती उत्सव २०२५ ची तयारी पूर्ण
सुर्यकांत जगताप
किल्ले-धारूर: शूरवीर महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त किल्ले-धारूर येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 'श्री महाराणा प्रताप जयंती उत्सव समिती, किल्ले-धारूर' यांच्या वतीने येत्या ९ मे २०२५ रोजी हा जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.
या विशेष दिनी सायंकाळी ५:३० वाजता महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेची पूजा आणि त्यानंतर शहरातून भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी वीर पुरुषांचे स्मरण आणि प्रेरणा घेणे अत्यंत आवश्यक आहे, या उद्देशाने हा उत्सव आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून बीडचे पोलीस अधीक्षक मा. नवनीत कंवर (भा.पो.से.) आणि केजच्या उपविभागीय पोलीस अधिकारी मा. कमलेश मीना (भा.पो.से.) लाभणार आहेत. कार्यक्रमाचे मार्गदर्शन किल्ले-धारूर नगरपरिषदेचे अध्यक्ष मा. डॉ. स्वरूपसिंह हजारी करणार आहेत.
या महत्वपूर्ण सोहळ्याला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष अभयसिंह चव्हाण आणि आयोजकांनी केले आहे.
Comments
Post a Comment