सटवाई मंदिर परिसर स्वच्छतेने उजळला; सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांना यश
सटवाई मंदिर परिसर स्वच्छतेने उजळला; सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांना यश
सुर्यकांत जगताप ( पत्रकार )
किल्ले धारूर: शहरातील पाटील गल्लीतील सटवाई मंदिर परिसर सामाजिक कार्यकर्ता कार्यकर्तेच्या जागरूकतेमुळे आणि नगरपरिषदेच्या तत्परतेमुळे स्वच्छतेने उजळून निघाला आहे. अनेक दिवसांपासून मंदिर परिसरात पसरलेले घाणीचे साम्राज्य पाहून, सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला आणि त्यातूनच ही सकारात्मक घडामोड समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सटवाई मंदिराच्या परिसरात मोठ्या प्रमाणात घाण साचली होती, ज्यामुळे भाविकांना आणि स्थानिक रहिवाशांना त्रास होत होता. ही बाब निकिता तिडके यांच्या 'सोशल वर्क ग्रुप' आणि सामाजिक कार्यकर्ते अमर महामुनी यांनी गांभीर्याने घेतली. त्यांनी तात्काळ मुख्याधिकारी महेश गायकवाड यांच्या निदर्शनास ही समस्या आणली.
या तक्रारीची दखल मुख्याधिकारी गायकवाड यांनी तातडीने घेतली. त्यांच्या आदेशानुसार, नगरपरिषदेचे स्वच्छता कर्मचारी आणि फायर ब्रिगेडचे वाहन घटनास्थळी पाठवण्यात आले. या पथकाने मंदिर परिसराची कसून स्वच्छता केली, ज्यामुळे संपूर्ण परिसर आता स्वच्छ आणि प्रसन्न दिसत आहे.
Comments
Post a Comment