सुकळीच्या पुनर्वसनाचा तिढा सुटला; ७ कोटींचा मावेजा मंजूर, प्रकारा दादा सोळंके यांच्या प्रयत्नांना यश



सुकळीच्या पुनर्वसनाचा तिढा सुटला; ७ कोटींचा मावेजा मंजूर, प्रकारा दादा सोळंके यांच्या प्रयत्नांना यश

सुर्यकांत जगताप ( पत्रकार )

किल्ले धारूर (प्रतिनिधी): धारूर तालुक्यातील सुकळी गावाच्या पुनर्वसनाचा अनेक वर्षांपासून तांत्रिक अडचणींमुळे रखडलेला प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. आमदार प्रकाश सोळंके यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हे शक्य झाले असून, यामुळे लाभार्थ्यांना ७ कोटी रुपयांचा मावेजा मिळणार आहे.
आज (गुरुवार, २३ मे) सुकळी येथे आमदार प्रकाशदादा सोळंके, नायब तहसीलदार पाळवदे मंडळ अधिकारी केदार आणि इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला, ज्यात मोठ्या संख्येने ग्रामस्थ, महिला आणि युवक सहभागी झाले होते.
यावेळी पुनर्वसित नागरिकांना त्यांच्या हक्काचे पी.टी.आर., जिवंत सातबारा आणि फार्मर आयडी पावतीचे वाटप करण्यात आले. पुनर्वसनानंतर गावाच्या भौतिक विकासासाठी ३ कोटी ६२ लाख रुपयांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता मिळाली असून, यात पिण्याच्या पाण्याची योजना, प्राथमिक शाळा, गावांतर्गत सिमेंट रस्ते व नाली बांधकाम, ग्रामपंचायत कार्यालय, लहान पूल, गावांतर्गत विद्युतीकरण, सार्वजनिक स्मशानभूमी आणि सार्वजनिक शौचालयासारख्या मूलभूत सुविधांचा समावेश आहे.
शेतकऱ्यांच्या शेतरस्त्यांमधील अडथळे दूर करण्यासाठी "सस्ता अदालत" उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले, जेणेकरून या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा निघू शकेल.

Comments

Popular posts from this blog

धारूर न्यायालय परिसरात हाणामारी; पत्रकारावर हल्ला, न्यायालयात खळबळ

अतिक्रमण हटवण्यावरून व्यापारी आणि नगरपरिषदेत मतभेद; रस्ता दुरुस्तीचे काम रखडण्याची शक्यता

श्रीकृष्ण इंग्लिश स्कूलची सयाजीराजे पार्कमध्ये धमाल सहल!