नेते माधव तात्या निर्मळ यांच्या प्रयत्नांना यश! धारूरसाठी उपमुख्यमंत्री अजितदादांच्या माध्यमातून मिळणार ५ MVA चा ट्रान्सफॉर्मर
नेते माधव तात्या निर्मळ यांच्या प्रयत्नांना यश! धारूरसाठी उपमुख्यमंत्री अजितदादांच्या माध्यमातून मिळणार ५ MVA चा ट्रान्सफॉर्मर
सुर्यकांत जगताप ( पत्रकार )
किल्ले धारूर: नेते माधव तात्या निर्मळ यांनी किल्ले धारूर शहर व तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून जाणवत असलेल्या कमी दाबाच्या वीजपुरवठ्याच्या समस्येवर तातडीने लक्ष वेधले. तालुक्यातील शेतकरी, व्यापारी, उद्योजक आणि सामान्य नागरिकांना यामुळे मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे, याची दखल घेत निर्मळ यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय ना. श्री. अजित दादा पवार साहेब यांची भेट घेतली आणि त्यांना या गंभीर परिस्थितीची माहिती देत ५ MVA चा नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्याची मागणी करणारे निवेदन सादर केले.
माधव तात्या निर्मळ हे नेहमीच आपल्या मतदारसंघातील नागरिकांच्या समस्यांसाठी तत्पर असतात. कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे शेतीमधील सिंचनाचे काम असो, व्यापार उद्योगातील अडचणी असोत किंवा सामान्य नागरिकांच्या घरातील गैरसोय असो, या सर्वांची जाणीव ठेवून त्यांनी तातडीने उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्याकडे या विषयाला नेले. त्यांच्या या सक्रिय भूमिकेमुळे धारूर तालुक्यातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
उपमुख्यमंत्री अजित दादा पवार हे नेहमीच जनतेच्या समस्यांना प्राधान्य देतात. माधव तात्या निर्मळ यांनी केलेल्या विनंतीची दखल घेत त्यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि धारूर तालुक्यातील वीजपुरवठ्याची समस्या दूर करण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. अजित दादा पवार यांच्या या तत्परतेमुळे धारूरकरांना लवकरच दिलासा मिळणार आहे, यात शंका नाही. त्यांचा विकासात्मक दृष्टिकोन आणि जलद निर्णय क्षमता यामुळे ते राज्यामध्ये एक लोकप्रिय आणि कार्यक्षम नेते म्हणून ओळखले जातात.
या महत्वपूर्ण भेटीच्या वेळी किल्ले धारूर नगरीचे उपनगराध्यक्ष बाळासाहेब गायकवाड पाटील हे देखील उपस्थित होते.
Comments
Post a Comment